Friday , November 22 2024
Breaking News

माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर

Spread the love

 

मुंबई : भारताचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकर याला बीसीसीआयने मोठी जबाबदारी दिली आहे. अजित आगरकरची टीम इंडियाचा निवड समिती अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अशोक मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या क्रिकेट सल्लागार समितीने अजित आगरकर याची मुलाखत घेतली, त्यानंतर त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. याआधीही अजित आगरकरने या पदासाठी अर्ज केला होता, पण चेतन शर्मा यांना ही जबाबदारी देण्यात आली होती.

टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे, या दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे. यासाठी टेस्ट आणि वनडे टीमची निवड झाली आहे, पण टी-20 सीरिजसाठीच्या टीमची घोषणा झालेली नाही. या टीमची निवड अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

अजित आगरकरची एकट्याचीच मुलाखत झाल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं. अजित आगरकर परदेशामध्ये असल्यामुळे ही मुलाखत ऑनलाईन घेण्यात आली. नॉर्थ झोनमधून कोणतंही उल्लेखनीय नाव नसल्यामुळे आगरकरची नियुक्ती सोपी झाल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आगरकरच्या नियुक्तीमुळे पश्चिम विभागामध्ये दोन निवड समिती सदस्य झाले आहेत. आता पश्चिम विभागामधून सलिल अंकोला, अजित आगरकर, मध्य विभागामधून सुब्रतो बॅनर्जी, दक्षिण विभागातून एस शरथ आणि पूर्व विभागातून एसएस दास निवड समिती सदस्य आहेत.

अजित आगरकरने 26 टेस्ट, 4 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 191 वनडे मॅच खेळल्या आहेत. याशिवाय तो 1999, 2003 आणि 2007 च्या वनड वर्ल्ड कपमध्य भारतीय टीममध्ये होता. 2007 सालच्या टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या टीममध्येही आगरकर होता. वनडेमध्ये सगळ्यात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम अजित आगरकरच्या नावावर आहे. याशिवाय आगरकरने लॉर्ड्सवर टेस्टमध्येही शतक झळकावलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *