Tuesday , March 3 2026
Breaking News

विश्वचषकाच्या 15 शिलेदारांची घोषणा; के. एल. राहुल, सूर्याला संधी

Spread the love

 

मुंबई : विश्वचषकासाठीच्या 15 शिलेदांराची घोषणा आज करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय शिलेदारांची नावे जाहीर केली. अपेक्षाप्रमाणे 15 खेलाडूंची निवड करण्यात आली आहे. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना अंतिम 15 खेळाडूमध्ये स्थान मिळाले नाही. सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे भारतीय संघ फक्त एकच प्रमुख फिरकी गोलंदाजासह विश्वचषकात उतरणार आहे. कुलदीप यादव याच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी असेल. तर इशान किशन आणि केएल राहुल विकिकेटकिपर म्हणून भूमिका बजावतील.

भारतीय संघाचे कॉम्बिनेशन
विश्वचषकासाठी भारतीय संघाचे कॉम्बिनेशन चांगले दिसत आहे. संघामध्ये पाच फलंदाज आहेत. दोन विकेटकिपर आहेत. 4 अष्टपैलू खेळाडू आणि चार गोलंदाजासह भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे.

विश्वचषकासाठी भारताचे 15 शिलेदार

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव

संजू-तिलक यांचा पत्त कट

विश्वचषकाच्या अंतिम 15 खेळाडूमध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांना संधी मिळाली नाही. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा यालाही स्थान मिळवण्यात यश आले नाही. भारताच्या 15 जणांच्या चमूमध्ये एकही ऑफ स्पिनर गोलंदाजाला स्थान दिले नाही. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांनाही अंतिम 15 खेळाडूमध्ये संधी देण्यात आली नाही.

केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त

विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याची विश्वचषकासाठी निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केएल राहुल याच्या फिटनेसबाबतही अपडेट दिली. केएल राहुल याने एनसीएमध्ये फिटनेसवर काम केलेय. त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. तो खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, असे अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *