Monday , December 8 2025
Breaking News

आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाच बादशाह!

Spread the love

 

नवी दिल्ली : आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडूंचाच बोलबाला दिसून येत आहे. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी आयसीसी क्रमवारीत बाजी मारली आहे. आयसीसी क्रमवारीत टेस्ट आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा युवा स्टार शुभमन गिल अव्वल फलंदाज आहे आणि मोहम्मद सिराज गोलंदाजीत पहिल्या क्रमांकावर आहे. अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 गोलंदाज आहे.

कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय खेळाडू अव्वल
भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय क्रिकेटसोबतच कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमध्येही अव्वल आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा दबदबा कायम आहे. शुभमन गिल आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे, तर गोलंदाजांच्या क्रमवारीत मोहम्मद सिराज अव्वल स्थानावर आहे. याशिवाय रवी अश्विन कसोटी फॉरमॅटमध्ये नंबर-1 गोलंदाज आहे. तर रवींद्र जडेजा कसोटी फॉर्मेटमध्ये नंबर 1 अष्टपैलू खेळाडू आहे. सूर्यकुमार यादव हा टी-20 फॉरमॅटमध्ये नंबर 1 फलंदाज आहे.

आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा
भारताचा सलामीवीर शुभमन गिल वनडे क्रमवारीत नंबर 1 फलंदाज बनला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल होता, मात्र आता शुभमन गिलने बाबर आझमला मागे टाकले आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व कायम आहे. शुभमन गिलशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा टॉप-10 फलंदाजांमध्ये समावेश आहे. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *