
मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी टीम इंडिया 1983, 2003 आणि 2011 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.
भारताने टॉस जिंकून पहिला फलंदाजी केली. त्यानंतर विराट कोहली (117), श्रेयस अय्यर (105), शुबमन गिल (नाबाद 80), रोहित शर्मा (47), केएल राहुल (नाबाद 39) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 397 धावांचा डोंगर रचला. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघ 48.5 षटकांत सर्व विकेट्स गमावून 327 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यांच्या डॅरेल मिचेलने (134), केन विल्यमसन (69), ग्लेन फिलिप्स (41) यांनी सामना जिंकण्यासाठी झुंज दिली. टीम इंडियाच्या मोहम्मद शमीने सर्वाधिक 7 बळी मिळवले. तर जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादवला 1-1 विकेट मिळाली.
Belgaum Varta Belgaum Varta