Sunday , December 7 2025
Breaking News

आयपीएल फायनलची वेळ बदलली, बीसीसीआयचा मोठा निर्णय

Spread the love

मुंबई : आयपीएलचा 15 वा हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. 22 मे रोजी अखेरचा लीग सामना होणार आहे. त्यानंतर प्लेऑफ आणि फायनलचा रनसंग्राम होणार आहे. 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये आयपीएलचा फायनल मुकाबला होणार आहे. इतर सामन्यांच्या तुलनेत हा महामुकाबला अर्धा तास उशीरा सुरु होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता अंतिम सामना होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल… सध्या साडेसात वाजता आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होते, तर सात वाजता नाणेफेक होतो. तर दुपारचा सामना साडेतीन वाजता सुरु होतो अन् तीन वाजता नाणेफेक होते..
दिमाखात समारोप
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. आयपीएलचा क्लोजिंग समारोप 29 मे रोजी सायंकाळी साडेसाहा वाजता सुरु होणार आहे. हा कार्यक्रम 50 मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता… पण आज झालेल्या बैठकीत समारोप कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
पुढील हंगामापासून वेळेत बदल
बुधवारी बीसीसीआयने आयपीएल 2023 बाबात मोठी घोषणा केली होती. क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, संभावित ब्रॉडकास्टरला सामना सायंकाळी आठ वाजता सुरु होणार असल्याचे सांगितले. तर दुपारचा सामना सांयकाळी चार वाजता सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच 16 व्या हंगामात डबल हेडर सामने कमी असतील, याचा विचार करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *