Sunday , September 8 2024
Breaking News

राजस्थानचा आरसीबीवर ४ गड्यांनी विजय; क्वालिफायरमध्ये हैदराबादशी गाठ

Spread the love

 

रोव्हमन पॉवेलच्या विजयी षटकारासह राजस्थानने आरसीबीवर ४ गड्यांनी मोठा विजय मिळवला. यासह आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे आरसीबीचे स्वप्न यंदाही भंगले आहे, रियान पराग आणि शिमरॉन हेटमायरची भागीदारी राजस्थान रॉयल्स संघाने ४ गड्यांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह राजस्थानचा संघ आयपीएल २०२४च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात खेळणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्समधील जो संघ जिंकेल तो संघ केकेआरविरूद्ध अंतिम सामन्यात खेळेल. आरसीबीनेही एलिमिनेटर सामन्यात अटीतटीची लढत दिली पण संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८ गडी गमावून १७२ धावा केल्या. रजत पाटीदार ३४, लोमरोर ३२, तर विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. राजस्थानकडून आवेश खानने ३ विकेट घेतल्या. अश्विनने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने काही गडी गमावल्या, परंतु सामना ४ विकेटने जिंकण्यात यश मिळविले.

रियान पराग आणि हेटमायरने ग्रीनच्या षटकात चांगल्याच धावा केल्या. यासह सामना राजस्थानच्या बाजूने झुकला. यशस्वी जैस्वाल आणि कोहलर कॅडमोरने संघाला चांगली सुरूवात करून दिली. जैस्वालने यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ४५ धावांची खेळी खेळली. रियान परागने ३६ आणि सिमरन हेटमायरने २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. यशस्वी जैस्वालची विकेट गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाला तिसरा धक्का कर्णधार सॅमसनच्या रूपाने बसला ज्याने केवळ १७ धावांची इनिंग खेळल्यानंतर आपली विकेट गमावली. यानंतर ११२ धावांवर राजस्थान संघाला चौथा धक्का ध्रुव जुरेलच्या रूपाने बसला जो ८ धावांवर धावबाद झाला. येथून रियान परागने एका टोकापासून डाव सांभाळत शिमरॉन हेटमायरच्या साथीने ५व्या विकेटसाठी २५ चेंडूत ४५ धावांची भागीदारी केली आणि सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने वळवला.

मात्र, आरसीबीने रियान परागला राजस्थान १५७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्यानंतर १६० धावांवर हेटमायरला पाठवून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. यानंतर रोव्हमन पॉवेलने राजस्थान संघाला विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी पार पाडली आणि ८ चेंडूत १६ धावांची नाबाद खेळी करत आयपीएलच्या १७व्या मोसमात आरसीबीचा प्रवास संपवला. आरसीबीसाठी या सामन्यात मोहम्मद सिराजने २ तर लॉकी फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांनी १-१ गडी बाद केले.

तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो संघाच्या चांगलाच पथ्यावर पडला. गोलंदाजांच्या शानदार प्रयत्नामुळे राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १७२ धावांवर रोखले. आरसीबीच्या फलंदाजांना नियमित अंतराने बाद करत मोठी भागीदारी रचू दिली नाही. याआधीच्या सामन्यांमध्ये बराच काळ विकेट न घेतलेल्या अनुभवी रविचंद्रन अश्विनने १९ धावांत दोन गडी बाद केल्या. जे फारच महत्त्वाचे ठरल

About Belgaum Varta

Check Also

कुस्तीमध्ये अमन सेहरावतने जिंकले कांस्य पदक

Spread the love  पॅरिस : भारताच्या २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *