Sunday , September 8 2024
Breaking News

वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत भारताने पाकिस्तानला लोळवले!

Spread the love

 

वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024 च्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला नमवले. या सामन्यात भारताने पाकिस्तानी संघावर पाच गडी राखून मात केली आहे. शनिवारी बर्मिंघम येथे हा सामना झाला. भारताने नुकताच टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आळा. त्यानंतर आता वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्टस 2024 स्पर्धेतही भारताने पाकिस्तानला नमवत विजयी कामगिरी करून दाखवली आहे.

पाकिस्तानच्या 156 धावा, अंबातीचे दमदार अर्धशतक
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमहर्षक लढत झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 156 धावा केल्या. तर भारतीय संघाने विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूपर्यंत पाच गडी राखून धावांचे हे लक्ष्य गाठले. भारताकडून अंबाती रायुडूने जोरदार खेळी करत 50 धावा केल्या. अंबातीच्या या खेळीमुळेच भारताला विजयापर्यंत जाणं सोपं झालं.

भारताची दमदार सुरुवात
विजयासाठी लागणाऱ्या धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली रॉबीन उथप्पा आणि अंबाती रायुडू सलामीला आले. अंबाती रायुडूने 30 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकार लगावत 50 धावा केल्या. तर उथप्पाला 10 धावाच करता आल्या. गुरकीरत सिंहनेही 33 चेंडूंत 34 धावा केल्या. यात युसूफ पठाणने 16 चेंडूंमध्ये 30 धावा करून भारताचा विजय सुकर केला. आपल्या या खेळात त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. कर्णधार युवराज सिंगला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने 22 चेंडूंमध्ये 15 धावा केल्या. तर पाकिस्तानी संघाच्या आमीरने दोन बळी घेतले. अजमल, रियाज आणि शोएब यांनी प्रत्येक एक बळी घेतला.

दरम्यान नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. या संघाचा सलामीवीर शरजील खान 10 चेंडूंमध्ये फक्त 12 धावा करून बाद झाला. मकसूदने 12 चेंडूंमध्ये 21 धावा केल्या. कामरान अकमलने 19 चेंडूंमध्ये 24 धावा केल्या. तर कर्णधार युनिस खानला 11 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा करता आल्या. गोलंदाजी विभागात भारतीय संघाकडून अनुरित सिंहने तीन बळी घेतले.

About Belgaum Varta

Check Also

कुस्तीमध्ये अमन सेहरावतने जिंकले कांस्य पदक

Spread the love  पॅरिस : भारताच्या २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *