Tuesday , March 3 2026
Breaking News

सूर्याकडे टी20 कर्णधारपदाची जबाबदारी तर शुभमन गिल उपकर्णधार

Spread the love

 

नवी दिल्ली : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करण्यात आली आहे. टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर वनडेचं कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडेच असेल. महत्वाचं म्हणजे, वनडे आणि टी20 संघाचे उपकर्णधार शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे आणि तीन सामन्याची टी20 मालिका होणार आहे. 27 जुलै ते 7 ऑगस्ट यादरम्यान टीम इंडिया श्रीलंकाविरोधात वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. टी20 चे सर्व सामने पल्लेकेले येथे होणार आहेत, तर वनडे सामने कोलंबो येथील मैदानात होणार आहेत.

टी20 मालिकेसाठी टीम इंडिया 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज

वनडे मालिकेसाटी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शधीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *