सिडनी : भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील चौथा कसोटी सामना गमावला. मेलबर्न सामन्यात भारतीय संघाने केलेल्या खराब कामगिरीवर गौतम गंभीर प्रचंड संतापला आहे. हा सामना बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या हिशोबाने महत्त्वपूर्ण होता. तेव्हा पराभवावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सीनियर खेळाडूंसह संपूर्ण संघाला खडे बोल सुनावले आहेत. त्याने ‘आता खूप झालं!’ असे उद्गार संघाला उद्देशून काढले.
द इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज हे परिस्थितीच्या हिशोबाने खेळत नसल्याचे म्हटले. खेळाडू हे आपल्या नैसर्गिक खेळाप्रमाणे मैदानात फलंदाजी करत असल्याचा दावा त्याने केला. कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी आपला खेळ आणि संघाते हित याकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर प्रचंड संतापला आहे. मैदानाबाहेरील योजना मैदानात अंमलात न आणल्याबद्दल त्याने खेळाडूंवर टीकादेखील केली. सप्टेंबर २०२४ बांग्लादेश मालिकेनंतर खराब फलंदाजीच्या मुद्द्यावर गंभीरने भर दिला.
खेळाडूंनी ड्रेसिंग रुममधील योजनांचे पालन केल्यास कारवाई केली जाईल असा थेट इशारा भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने दिला आहे. मेलबर्न सामन्यामध्ये वाइड चेंडूमुळे विराट कोहली बाद झाला. रिषभ पंत परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेपर्वाईने बाद झाला. रोहित शर्माचा खराब फॉर्म सुरु आहे. त्यात वरिष्ठ खेळाडू बाद झाल्याने दबाबाखाली येत यशस्वी जैस्वाल बाद झाला. एकूणच भारताची प्राथमिक आणि मध्यम फळी फलंदाजीत संघर्ष करत आहे असे म्हटले जात आहे.