Tuesday , March 3 2026
Breaking News

हिटमॅन रोहित शर्माची अचानक कसोटीमधून निवृत्ती

Spread the love

 

मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्माने अचानक कसोटीमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती सर्वांना दिली. भारतीय संघ आयपीएलनंतर पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पण त्याआधीच रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करत मोठा धक्का दिला.

हिटमॅन म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या रोहितने बुधवार ७ मे रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे कसोटी क्रिकेटला निरोप दिला. रोहितच्या निवृत्तीची बातमी त्याच वेळी आली जेव्हा निवड समितीने त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंड दौऱ्यावर संघात स्थान मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती. रोहितने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने त्याच्या २८० क्रमांकाच्या कसोटी कॅपचा फोटो पोस्ट केला. यासोबतच त्याने निवृत्तीची घोषणा केली.

गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. विशेषतः त्याचे कर्णधारपद धोक्यात होते. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर ०-३ असा क्लीन स्वीप झाल्यानंतर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या पराभवानंतर रोहित कर्णधारपदावर राहिल याबाबत शंका होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कामगिरीनंतर रोहित शर्माला कसोटी संघात स्थान मिळेल याबाबत शंका होती.

रोहितला आशा होती की तो इंग्लंड दौऱ्यावर जाईल आणि संघाचे नेतृत्व करेल. पण मंगळवारी, ६ मे रोजी निवड समितीने त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला, ज्याची माहिती बीसीसीआयलाही देण्यात आली होती आणि बीसीसीआयने देखील हिरवा कंदील देण्याचे म्हटले.

रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर कसोटी क्रिकेटची डेब्यू कॅपचा फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले की, “हॅलो, मला सर्वांना हे सांगायचं आहे की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचे नेतृत्त्व करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला इतकं वर्ष खूप प्रेम आणि कायम पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार. मी वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहणार आहे.”

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *