
मुंबई : 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2025साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाचा संघ जाहीर केला. यंदाचा आशिया कप टी-20 स्वरूपात रंगणार असून टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या कर्णधार शुभमन गिलला पण संघात स्थान मिळालेले आहे. तर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना जागा मिळाली आहे.
आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षितराणा, रिंकू सिंग.

Belgaum Varta Belgaum Varta