Sunday , December 7 2025
Breaking News

आशिया हॉकी कप 2025 : भारताने चौथ्यांदा कोरले आशिया कपवर नाव!

Spread the love

 

नवी दिल्ली : आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 धुव्वा उडवला आणि स्पर्धेच्या जेतेपदावर चौथ्यांदा नाव कोरले. भारतीय संघ या स्पर्धेत अजेय राहिला. भारताने या स्पर्धेत एकही सामना गमवला नाही. सुपर 4 फेरीतील एकमेव सामना दक्षिण कोरियासोबत झाला होता. हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. मात्र अंतिम फेरीत भारताने दक्षिण कोरियाला पुन्हा संधी दिली नाही. पहिल्या मिनिटापासून भारतीय संघाने आघाडी घेतली. सुखजीत सिंगने 30 व्या सेकंदाला पहिला गोल केला. त्यामुळे दक्षिण कोरिया संघाची बरोबरीची धडपड सुरु झाली. मात्र त्यांना पहिल्या सत्रात तर बरोबरी काही साधता आली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात भारत आघाडी घेत राहिला. तर चौथ्या सत्रात एक गोल करण्यात कोरियाला यश आलं. पण तिथपर्यंत बराच वेळ झाला होता.

दुसऱ्या सत्रात भारताने आणखी एका गोलची आघाडी घेतली. दिलप्रीत सिंगने 27 व्या मिनिटाला हा गोल साधण्यात यश आलं. यामुळे टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली. संजयने लाँग बॉल घेत तो दिलप्रीतकडे पास केला. दिलप्रीतने या संधीचं सोनं केलं आणि गोलकीपरच्या पायांमधून गोलपोस्टच्या आत चेंडू मारला. यासह भारताने 2-0 अशी आघाडी घेतली.

तिसऱ्या सत्रात संजयला ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर भारताला खेळाडूंसह उतरावं लागलं. पण ही परिस्थिती फक्त एक मिनिट होती. तिसऱ्या सत्राच्या शेवटच्या मिनिटाला दिलप्रीतने तिसरा गोल मारला. यासह भारताने 3-0 ने आघाडी घेतली. भारताच्या विजयाच्या आशा आणखी बळकट केल्या.

चौथ्या सत्रात अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवरून भारतासाठी हा गोल केला. यासह 4-0 ची आघाडी घेतली. या सत्रात कोरियाने कमबॅक करण्याच पुरेपूर प्रयत्न केला आणि एक गोल मारला. तेव्हा स्थिती 4-1 अशी झाली.

भारताने यापूर्वी पहिल्यादा 2003 मध्ये जेतेपद मिळवले होते. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 4-2 पराभूत केले आणि विजय मिळवला होता. त्यानंतर 2007 मध्ये दक्षिण कोरियाचा पराभव केला. या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 7-2 ने धुव्वा उडवला होता. त्यानंतर 2017 मध्ये मलेशियाला 2-1 पराभूत केले होते. आता 2025 स्पर्धेत दक्षिण कोरियाला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरले.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *