Sunday , December 7 2025
Breaking News

मुलाच्या एका ओव्हरमध्ये 5 सिक्स, वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Spread the love

 

दुबई : श्रीलंकेचा उदयोन्मुख क्रिकेटपटू दुनिथ वेलालागेला मोठा धक्का बसला आहे. दुनिथ वेलालागेचे वडिल सुरंगा वेलालागे यांचे निधन झाले. दुनिथ आशिया कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात खेळत असतानाच ही दु:खद घटना घडली. या सामन्यात श्रीलंकेने शानदार विजय मिळवला. त्यांनी सुपर फोरमध्ये प्रवेश केलाय. दुनिथ वेलालागे या मॅचमध्ये खेळत होता. पण सामना संपल्यानंतरच त्याला वडिलांच्या निधनाची माहिती देण्यात आली. ही बातमी कळताच दुनिथ वेलालागे शोकसागरात बुडाला.

या घटनेनंतर दुनिथ वेलालागे लगेच मायदेशी रवाना झाला. आता तो आशिया कपच्या उर्वरित सामन्यात तो खेळणार की नाही? याबद्दल शंका आहे. श्रीलंकेला आता सुपर फोरमध्ये बांग्लादेश, पाकिस्तान आणि भारतासारख्या मजबूत संघांविरुद्ध खेळायचं आहे. दुनिथ वेलालागेची अनुपस्थिती टीमसाठी आव्हानात्मक ठरु शकते.

दुनिथ वेलालागेच्या वडिलांच्या मृत्यूच कारण अजून स्पष्ट झालेले नाही. काही मिडिया रिपोर्ट्सनी या घटनेला सामन्याशी जोडलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात शेवटची ओव्हर दुनिथ वेलालागेनेच टाकली होती. हे षटक खूप महागड ठरलं. दुनिथ वेलालागेच्या या ओव्हरमध्ये मोहम्मद नबीने पाच सिक्स मारले. एकूण 32 धावा या ओव्हरमध्ये वसूल केल्या. मिडिया रिपोर्ट्सनुसार, या ओव्हरनंतरच दुनिथ वेलालागेच्या वडिलांना हहृदयविकाराचा झटका आला. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून या घटनेवर अजून काही अपडेट आलेली नाही.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *