Friday , October 25 2024
Breaking News

प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाचे तरुणावर लैंगिक अत्याचार?

Spread the love

 

आरोप करणाऱ्यावर सुरज रेवण्णाकडून गुन्हा दाखल

बंगळुरू : महिलांचे लैंगिक शोषण आणि त्याचे व्हिडीओ बनविल्याप्रकरणी कर्नाटकमधील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा अटकेत आहे. यानंतर आता रेवण्णा कुटुंबियांवर आणखी एक आरोप झाला आहे. प्रज्ज्वल रेवण्णाचा मोठा भाऊ आणि जेडीएस पक्षाचा आमदार सुरज रेवण्णाही लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात चर्चेत आला आहे. हासन जिल्ह्यात सुरज रेवण्णाने पोलिसांत एक तक्रार दाखल केली. मला खोट्या लैंगिक अत्याचार प्रकरणात गोवण्याची धमकी देऊन खंडणी मागितली जात आहे, अशी तक्रार सुरज रेवण्णाने केली आहे. तर ज्याविरोधात तक्रार दाखल केली, त्याने लैंगिक अत्याचार झाले असल्याचा आरोप केला आहे.

एफआयरनुसार, सुरज रेवण्णा आणि त्यांचा सहकारी शिवकुमार यांनी म्हटले की, चेतन आणि त्याचा एक नातेवाईक लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. पैसे न दिल्यास सुरज रेवण्णाची बदनामी करू, अशी धमकीही त्यांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी चेतन हा सुरज रेवण्णाचा सहकारी असलेल्या शिवकुमारचा मित्र आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे नोकरी मिळावी यासाठी त्याने शिवकुमारला गळ घातली होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान आपण सुरज रेवण्णाची भेट घालून देऊ, असे आश्वासन शिवकुमारने चेतनला दिले होते.

१७ जून रोजी चेतनने शिवकुमारला फोन केला. आदल्या दिवशी आपण सुरज रेवण्णाच्या फार्महाऊसवर नोकरी मागण्यासाठी गेलो होतो, असा दावा चेतनने केला. मात्र नंतर त्याने स्वतःवर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. तसेच रेवण्णा आणि त्यांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याची धमकी दिली. आपल्याला ५ कोटी रुपये दिले नाहीत तर आपल्यावर लैंगिक अत्याचार केले गेले, अशी तक्रार करण्याची धमकी चेतनने दिली. सुरज रेवण्णाने आणि शिवकुमार या धमकीकडे कानाडोळा केल्यानंतर चेतनने खंडणीची रक्कम कमी कमी करत ती अडीच कोटींवर आणली. चेतनचा आणखी एक नातेवाईकही या धमकी प्रकरणात सहभागी झाला आणि त्याने चेतनच्या फोनवरून शिवकुमारला धमकी देणारे संदेश पाठविले.

चेतनच्या धमकीमुळे सुरज रेवण्णा आणि शिवकुमार यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी चेतनवर भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम ३८४, कलम ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावातील विधिमंडळ अधिवेशनासाठी बराक ओबामाना निमंत्रण

Spread the love  शताब्दी समितीच्या बैठकीत निर्णय, बेळगावातील कॉंग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *