Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटकमध्ये राहणाऱ्यांनी कन्नडमध्येच बोलले पाहिजे, दुसऱ्या भाषा वापरू नये : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Spread the love

 

बंगळुरू : महाराष्ट्रात मराठी भाषेचे पतन होत असताना इतर राज्य मात्र त्यांची भाषा जतन करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. कर्नाटक हे राज्य मातृभाषेसाठी पूर्वीपासून आग्रही असल्याचे अनेकदा दिसले आहे. सीमावर्ती भागातील मराठी बांधवांनी कन्नडमध्येच व्यवहार करावेत, यासाठीही अनेकदा संघर्ष उडालेला आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कन्नडीगांसाठी केलेले एक आवाहन चर्चेचा विषय ठरत आहे. कन्नडीगांनी आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. यासाठी राज्यातील प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलले पाहिजे, इतर दुसऱ्या भाषांचा वापर करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कर्नाटक विधिमंडळाच्या पश्चिम द्वाराजवळ उभारण्यात आलेल्या नाददेवी भूवनेश्वरी मातेच्या पुतळ्याचे उद्घाटन करत असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कन्नड भाषेबद्दल आपले विचार व्यक्त केले.

“कर्नाटकमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कन्नड वगळता इतर कोणतीही भाषा बोलली जाणार नाही, अशी शपथ सर्वांनी घ्यावी. कन्नड लोक उदार असल्यामुळेच आता इतर भाषा बोलून आपण कर्नाटकमध्ये राहू शकतो, असे वातावरण निर्माण झाले आहे. हीच परिस्थिती तुम्हाला तमिळनाडू, आंध्रप्रदेश किंवा केरळ या राज्यात दिसणार नाही. तिथे फक्त त्यांच्या मातृभाषेत संवाद साधला जातो. त्यामुळे आपणही आपल्याच मातृभाषेत संवाद साधला पाहिजे. हीच आपल्यासाठी अभिमानाची बाब असेल”, अशी भावना सिद्धरामय्या यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.

कर्नाटकमध्ये कानडी वातावरण निर्माण करणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या सर्वांनीच कन्नडमध्ये बोलले पाहिजे. कन्नड भाषेबद्दल जिव्हाळा वाढला पाहिजे, कन्नड भाषेबरोबरच आपला देश, आपली भूमी याबद्दलही प्रत्येकाने अभिमान बाळगायला हवा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *