Wednesday , January 8 2025
Breaking News

बंगळूरातील दोन मुलांना ‘एचएमपीव्ही’ संसर्ग

Spread the love

 

सरकार अलर्ट, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना

बंगळूर : शेजारच्या चीनमध्ये एचएमपीव्ही संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर, बंगळूर शहरात देशात प्रथमच ८ महिन्यांच्या आणि तीन महिन्यांच्या मुलामध्ये विषाणू दिसून आला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण आहे.
आठ महिन्यांच्या बालकाला काही दिवसांपूर्वी ताप आल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्त तपासणीदरम्यान एचएमपीव्ही विषाणूची उपस्थिती आढळून आली.
दुसऱ्या प्रकरणात, बंगळुरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या तीन महिन्यांच्या चिमुरडीला एचएमपीव्ही विषाणू असल्याची पुष्टी झाली. मात्र, या अर्भकाला आधीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
एचएमपीव्ही विषाणू भारतातही आहे. मात्र, हे उत्परिवर्तन आहे की नाही याबाबत स्पष्ट माहिती नाही. चीनमध्ये व्हायरस कसा बदलला हे देखील माहित नाही. बंगळुरमध्ये आढळून आलेला विषाणू हा सामान्य विषाणू आहे की चायनीज स्ट्रेन याबाबत बराच गोंधळ आहे. सामान्य एचएमपीव्ही व्हायरस ०.७८ टक्के असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव हर्षगुप्ता यांनी सांगितले.
विषाणू असलेल्या मुलाचा आणि कुटुंबातील सदस्यांचा प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने या विषाणूचे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला आहे. कोणीही काळजी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्राला अहवाल
बालकामध्ये विषाणू आढळून आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य विभागाला दिली. केंद्रीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहून खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने राज्याला दिल्या आहेत.

आयसीएमआरची पुष्टी
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिसिन (आयसीएमआर) ने पुष्टी केली आहे की चीनवर परिणाम करणाऱ्या एचएमपीव्हीने देखील भारतात प्रवेश केला आहे आणि बंगळुरमध्ये प्रवासाचा इतिहास नसलेली दोन प्रकरणे आढळून आली आहेत.
तीन महिन्यांच्या बाळाला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, तर आठ महिन्यांचे बाळ रुग्णालयात बरे होत आहे, असे आयसीएमआरने एका निवेदनात म्हटले आहे.
आयसीएमआरच्या देशभरातील श्वसन रोगांवर लक्ष ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दोन्ही प्रकरणे ओळखली गेली. एचएमपीव्ही संसर्ग भारतासह जगभरात पसरला आहे.
एचएमपीव्ही हा श्वसनाचा विषाणू आहे ज्यामुळे सामान्यतः सर्दीसारखीच सौम्य लक्षणे दिसून येतात. ते म्हणाले की, विशेषतः ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांच्यामध्ये ते लवकर पसरते.

एचएमपीव्ही म्हणजे काय?
चीनमध्ये चिंता निर्माण करणारा एचएमपीव्ही विषाणू नवीन नाही, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या म्हणण्यानुसार, २००१ मध्ये तो पहिल्यांदा सापडला होता. तथापि, काही सेरोलॉजिक पुरावे सूचित करतात की हा विषाणू १९५८ च्या सुरुवातीस व्यापक होता, असे तज्ञांनी सांगितले.
कोरोना विषाणू किंवा कोविड-१९ हा एसएआरएस-सीओव्ही-२ विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. एचएमपीव्ही विषाणू आणि कोरोना विषाणू काही प्रकारे समान आहेत. उदाहरणार्थ, दोन विषाणूंमुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये श्वसनाचे आजार होतात. लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना सर्वाधिक धोका असतो.
एचएमपीव्ही विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. याबाबत काळजी करण्याची गरज नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

गुजरातमध्येही व्हायरस आढळला
बंगळुरमध्ये एचएमपीव्ही विषाणूची दोन प्रकरणे समोर आल्याने चिंता निर्माण झाली असतानाच गुजरात राज्यातही पहिला रुग्ण आढळून आला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दोन वर्षाच्या मुलामध्ये एचएमपीव्ही विषाणूच्या उपस्थितीची पुष्टी केली आहे, ज्याला अहमदाबाद विभागातील चांदखेडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

धारवाडला स्वतंत्र महापालिकेचा दर्जा

Spread the love  हुबळी-धरवाड महापालिकचे विभाजन बंगळूर : हुबळी-धारवाड महानगर पालिकेचे विभाजन करून स्वतंत्र धारवाड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *