Friday , November 6 2026
Breaking News

खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या घरावर लोकायुक्त छापा

Spread the love

 

बेळगाव : राज्यातील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आज सकाळी लोकायुक्तांनी छापा टाकला आहे. यामध्ये खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या घरावरही लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली.

काही माहितीच्या आधारे तक्रार मिळाल्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने खानापूर तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांच्या घरावर छापा टाकला. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी प्रकाश गायकवाड यांच्या गणेशपूर, निपाणीतील बेळगाव येथील घरांवर आणि खानापुर येथील कार्यालयावर छापे टाकून महत्त्वाची माहिती ताब्यात घेतली आहे.

बेंगळुरूसह राज्यातील 8 भागात लोकायुक्तांचा हल्ला

गदग, बेल्लारी, बिदरसह 8 भागात एकाच वेळी छापा घालण्यात आला. बेकायदा मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा छापा घालण्यात आला असून लोकायुक्त अधिकारी कागदपत्रे तपासत आहेत. परिवहन विभागाच्या सहसंचालक शोभा माने यांच्यावर घरावरही छापा घालण्यात आला.

कोणाच्या घरावर छापा!
शोभा, सहसंचालक, परिवहन विभाग
डॉ.एस.एन. उमेश, कदूर कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी
रवींद्र, बिदर लघु पाटबंधारे विभागाचे निरीक्षक
गडग बेटीगेरी नगरपरिषदेचे हुच्चेशचे ए.ई.ई
आरएच लोकेश, बेल्लारी बीसीएम तालुका अधिकारी
हुली राज, रायचूर जेसकॉम ज्युनियर इंजिनियर

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *