Sunday , September 20 2026
Breaking News

कडोली संमेलनाची शुक्रवारी मुहूर्तमेढ

Spread the love

 

कडोली : मराठी साहित्य संघ, कडोली आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे होणाऱ्या 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपाचा मुहूर्तमेढ समारंभ शुक्रवारी (ता. 10) सकाळी 10 वाजता होणार आहे. कडोलीतील श्री दुरदूंडेश्वर विरक्त मठाच्या आवारात हा कार्यक्रम होईल.
मराठा बँकेचे नवनिर्वाचित संचालक विनायक होनगेकर अध्यक्षस्थानी असतील. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ॲड. श्याम पाटील उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन कृष्णा पाटील, मयूर शहापूरकर, सिद्राय लाड, अमोल फडके, उमेश यशवंत पाटील, चंद्रकांत शिवाजी पाटील, साहिल राजू मायाण्णा, सुनील आंद्याप्पा चौगुले, परशराम यल्लाप्पा राजाई आदी उपस्थित राहणार आहेत. ह. भ. प. श्रीधर नाडगौडा पौरोहित्य करतील.
रविवार दि. 19 जानेवारी रोजी होणाऱ्या 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या या मुहूर्तमेढ समारंभाला सर्व साहित्य प्रेमी बंधू भगिनी, विविध संघ, संस्थांचे पदाधिकारी, गावकरी, कार्यकर्ते आदींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *