बंगळूर : कर्नाटकमधील पदवीपूर्व शिक्षण विभागाने बारावी (पीयुसी द्वितीय) परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केला असून हंगामी वेळापत्रक जाहीर केले आहे.
बारावी आणि जेईई परीक्षा एकाचवेळी आल्याने, पदवीपूर्व शिक्षण विभागाने परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे. आता २२ एप्रिल ते ११ मे या कालावधीत परीक्षा होईल. सुधारित हंगामी वेळापत्रकावर आक्षेप घेण्यासाठी ५ मार्चपर्यंत वेळ देण्यात आली आहे.
यापूर्वी बारावीची परीक्षा १६ एप्रिल ते ६ मे दरम्यान होणार होती. परंतु जेईई परीक्षा याच काळात आल्याने हा बदल करण्यात आला आहे.
याबाबत शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी ट्विट केले आहे, की राज्याच्या बारावीच्या परीक्षा आणि एनटीईच्या जेईई परीक्षेचे काही पेपर्स एकाच वेळी येत असल्याने विद्यार्थ्यांच्या योईसाठी परीक्षेच्या वेळापत्रकात (तात्पुरती) सुधारणा करण्यात आली आहे. यावर आक्षेप नोंदवण्यासाठी ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आल्याचे सांगत नवीन वेळापत्रक शेअर केले आहे.
सुधारित हंगामी वेळापत्रक असे
२२ एप्रील – तर्कशास्त्र आणि व्यवहार अध्ययन
२३ एप्रील – हिंदी
२५ एप्रील – अर्थशास्त्र
२६ एप्रील – हिंदुस्थानी संगीत, मानसशास्त्र , रसायनशास्त्र
२७ एप्रील – तमिळ, तेलगू, मल्याळम, मराठी, उर्दू, संस्कृत, फ्रेंच
२८ एप्रील – कन्नड, अरबी
३० एप्रील- समाजशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान
२ मे – भूगोल, जीवशास्त्र
४ मे – इंग्रजी
५ मे – माहिती तंत्रज्ञान, रिटेल, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, ब्यूटी अँड वेलनेस
६ मे – गणित, शिक्षण, मूलभूत गोष्टी
७ मे – पर्यायी कन्नड, लेखाशास्त्र, भूविज्ञान, गृह विज्ञान
९ मे – इतिहास, भौतिकशास्त्र
११ मे – राज्यशास्त्र, संख्याशास्त्र
Check Also
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची शस्त्रेही जप्त
Spread the love कोप्पा तालुक्यातील मेगुरु जंगलात सापडली शस्त्रे बंगळूर : नक्षलवाद सोडून मुख्य प्रवाहात …