
अंकोला : उत्तर कन्नड जिल्ह्यात घडलेल्या घटनेत चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात कोसळली आणि बसमध्ये अडकलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला.
बेळगावहून मंगळुरूला जाणारी ही खाजगी बस असल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि खड्ड्यात कोसळली. ही घटना उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील अगासुरुजवळ घडली. बसमध्ये अडकलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. २५ प्रवाशांना वाचवण्यात आले आणि ते सुखरूप बचावले.

जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशाचा मृतदेह क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग ६३ वर घडली.


Belgaum Varta Belgaum Varta