बेंगळुरू : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक शेतकरी संघटनांनी हे आंदोलन छेडले असून प्रत्येकाने भारत बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केले आहे.
केंद्राच्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात 27 सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अनेक संघटनांकडून पाठिंबा मिळाला आहे. शनिवारी फ्रिडम पार्क येथे कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीत चालक असोसिएशनचे सदानंदस्वामी, के. आर. मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेशगौड, सीआयटीयू च्या राज्य अध्यक्षा वरलक्ष्मी यांच्यासह अनेकांनी भारत बंद यशस्वी करण्यासंदर्भात चर्चा केली.
यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना कोडीहळ्ळी चंद्रशेखर म्हणाले की, 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता के. आर मार्केटपासून मोर्चाला प्रारंभ करण्यात येणार आहे. म्हैसूर बँक चौकातून मार्गस्थ होऊन त्यानंतर सकाळी 11 वाजता टाऊनहॉल येथे हा मोर्चा पोहोचेल. सरकारच्या बाजूने असणारे या बंदला आक्षेप घेत असल्याचे कोडीहळ्ळी म्हणाले. कोडीहळ्ळी पुढे म्हणाले की, केंद्र सरकार सर्वत्र खासगीकरण अवलंबत आहे. रेल्वे, बंदर, महामार्ग अशा अनेक ठिकाणांचे खाजगीकरण करण्यात आले आहे. शेती आणि शेतकर्यांचे खाजगीकरण होऊ नये यासाठी, याला विरोध दर्शविण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. आमच्या आंदोलनाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, बंदला कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारच्या भारत बंदसाठी अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. तर काही संघटनांनी या आंदोलनाला विरोध दर्शविला आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेला बंद यशस्वी होईल की नाही? याकडे आता सार्यांचे लक्ष लागले आहे.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …