Saturday , October 19 2024
Breaking News

राज्यातील जनतेला सुखाने जगू द्या : एच. डी. कुमारस्वामी

Spread the love

बेळगाव : राज्यातील जनतेला सुखाने-सन्मानाने जगू द्या, तुमच्या-तुमच्या चड्ड्या फाडा, पण जनतेच्या चड्ड्या फाडू नका अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस व भाजप नेत्यांना सुनावले.
बेळगावात रविवारी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, एकमेकांच्या चड्ड्या काढल्याने यांना काय मिळते? आधी काँग्रेसवाल्यांनी चड्डी काढली. त्यानंतर गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी काँग्रेसची चड्डी फाडू म्हटले. तुमच्या-तुमच्या चड्ड्या जरूर फाडा, पण राज्यातील जनतेच्या चड्ड्या फाडू नका असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.
कुमारस्वामी पुढे म्हणाले, सरसंघचालक मोहन भागवत यांनी, प्रत्येक मशिदीत मंदिर शोधू नका असा सल्ला दिला आहे. त्यावर काळ ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांनी भागवत यांचा सल्ला ऐकलं पाहिजे असे सांगितले आहे. रघुपति भट यांनी हे थांबविले पाहिजे असे म्हटले आहे. एकीकडे असे बोलायचे अन दुसरीकडे दुसरीच गोळी झाडून समाजाला भडकवायचे. हे कोण करवून घेत आहे? हे सगळे पाहूनही सरकार का ढिम्म आहे? करण्यासाठी दुसरी अनेक कामे आहेत असे कुमारस्वामींनी यावेळी सुनावले.
उत्तर कर्नाटकाचा विकास होण्यासाठी बेळगावला दुसर्‍या राजधानीचा दर्जा देण्याचा निर्णय मी घेतला होता. बेळगावात चांगले वातावरण आहे. मूलभूत सुविधा आता थोड्या वाढल्या आहेत. तेंव्हा बेळगावात विधिमंडळ अधिवेशन घेतल्यानंतर 2006 पासून बेळगावातील मूलभूत सुविधांमध्ये वाढ झाली आहे. आता अनेक प्रकारचे उद्योग स्थापन करण्यासाठी बेंगळूरनंतर दुसर्‍या टप्प्यातील बेळगाव, कलबुर्गी, मंगळूर अशा शहरात उद्योग स्थापनेसाठी पावले उचलली पाहिजेत अशी सूचना कुमारस्वामींनी केली. केवळ कित्तूर कर्नाटक, कल्याण कर्नाटक असे नामकरण केल्याने लगेच काही बदल होत नाही. बेळगावात अनेक उद्योग स्थापन करण्याची संधी आहे. त्या दृष्टीने 3 वर्षांत काय केले? तुमचे स्वबळावरील सरकार आहे. दुसर्‍यांच्या पाठिंब्याचे नव्हे. अशी उत्तम संधी वाया का घालवताय? असा सवाल कुमारस्वामींनी सरकारला केला.

About Belgaum Varta

Check Also

लिंगायताना कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Spread the love  पंचमसाली लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा बंगळूर : पंचमसाली लिंगायत समाजाला वर्ग-२ अ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *