प्रकाश हुक्केरी, निराणी यांची आघाडी
बेळगाव : पश्चिम शिक्षक मतदार संघात माजी शिक्षण मंत्री सध्या भाजपात आलेले भाजपाचे उमेदवार बसवराज होरट्टी यांनी 4669 मते मिळवत विजय संपादन केला आहे.
बसवराज होरट्टी यांना 9266 मते मिळाली तर यांच्याविरोधातील काँग्रेसच्या उमेदवाराला 4597 मते मिळाली आहेत. या विजयाने होरट्टी यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या ना एक प्रकारे चपराक दिली आहे.
वायव्य शिक्षक मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये आघाडी मिळवली आहे. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत एकवीस हजार पैकी जवळपास सहा हजार मतमोजणी पूर्ण झाली आहे आणि अद्याप 14000 मतमोजणी व्हायची बाकी आहे. यामध्ये प्रकाश हुक्केरी यांनी भाजपचे उमेदवार अरुण शहापूर यांच्यावर 1800 मतानी आघाडी मिळवली आहे.
वायव्य कर्नाटक पदवीधर मतदार संघामध्ये भाजपच्या हनुमंत निराणी यांनी मोठी आघाडी मिळवली असून ते मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. वायव्य कर्नाटक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी यांनी आणि भाजपच्या हनुमंत निराणी आघाडीवर आहेत.
