Saturday , October 19 2024
Breaking News

घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण मिळेल : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Spread the love

 

मराठा समाज विकास प्राधिकरण कार्यालयाचे शानदार उद्घाटन
बेंगळूरू : स्वातंत्र्य संग्रामात मराठा समाजाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. छत्रपती शिवरायांनी राष्ट्राच्या हितासाठी आपले कार्य केले अशा मराठा समाजाने आपल्या जीवनात नेहमीच मोठी साथ दिली आहे. या समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी सातत्याने केली जात आहे. घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण निश्चितच मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला आहे.
कर्नाटक मराठा समाज विकास प्राधिकरण कार्यालयाचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण असा संयुक्त कार्यक्रम बेंगळूर येथील आरमने मैदान, त्रिपुरवासिनी येथे पार पाडला.
यावेळी मराठा विकास प्राधिकरणाच्या फलकाचे अनावरण करून बोलताना मुख्यमंत्री बोम्मई पुढे म्हणाले, सरकारने राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. मराठा समाज विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध प्रकारचे उपक्रम आणि योजना हाती घेतल्या जात आहेत. यासाठी सरकारने 100 कोटी रुपये अनुदान प्राधिकरणाला दिले आहे. प्राधिकरणाला मिळालेल्या निधीतून कष्टकरी, शेतकरी, युवा, महिला, आणि बेरोजगारांच्या समस्या सोडविल्या जाव्यात.
मराठा समाजाने केलेल्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात, मागास आयोगाशी चर्चा केली जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही याची दखल घेऊन, मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत आरक्षण जाहीर केले जाईल. त्याचबरोबर चन्नगिरी येथे संभाजी महाराज तसेच कणकगिरी येथे शहाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या जिर्णोद्धारासाठी दहा कोटी रुपये निधी जाहीर करत असल्याचेही बोम्मई यांनी यावेळी स्पष्ट केले.
श्री गोसावी महासंस्थान मठाचे परमपूज्य जगद्गुरु वेदांताचार्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झालेल्या कार्यक्रमात, कर्नाटक राज्य मराठा समाज विकास प्राधिकरण कार्यालयाचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते करण्यात आले. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते प्राधिकरणाच्या लोगोचे अनावरण केले. मंत्री अश्वथ नारायण, मंत्री शशिकला जोल्ले, माजी मंत्री श्रीमंत पाटील, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, आमदार डॉ. अंजली निंबाळकर, एन.नागराजू, कर्नाटक क्षत्रिय फेडरेशन राज्य अध्यक्ष शामसुंदर गायकवाड, उपाध्यक्ष माजी आमदार मनोहर कडोलकर, ओबीसी मोर्चाचे किरण जाधव, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह कर्नाटक राज्यातील मराठा समाजाचे असंख्य मान्यवर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठा समाज विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

About Belgaum Varta

Check Also

लिंगायताना कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Spread the love  पंचमसाली लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा बंगळूर : पंचमसाली लिंगायत समाजाला वर्ग-२ अ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *