बेळगाव : कर्नाटक राज्याचे वन मंत्री उमेश कत्ती यांचे काल हृदयविकाराने बेंगळुरू येथे निधन झाले.
दरम्यान, आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी (७ सप्टेंबर) रोजी जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.