बेंगळुरू : अलिकडेच झालेल्या 2021चा दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी निकाल जाहीर केला आहे. एकूण 53 हजार 155 विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 522 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 55.54 टक्के निकाल लागला.
27 आणि 29 सप्टेंबर रोजी दोन दिवस दहावीची पुरवणी परीक्षा झाली होती. पूरवणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी प्रश्न होते. प्रत्येक विषयासाठी चाचणी 40 गुणांपर्यंत मर्यादित होती. राज्यात 55.44 टक्के निकाल लागला आहे. मुलांपेक्षा मुलीनीच निकालात बाजी मारल्याचे शिक्षण मंत्री शिक्षणमंत्री बी. सी. नागेश म्हणाले.
कोरोना लॉकडाऊनमुळे परीक्षेला नोंदणी करू न शकलेल्या आणि शुल्क न भरल्यामुळे परीक्षेला उपस्थित राहू न शकलेल्या मुडबिद्री अल्वाच्या शिक्षण संस्थेतील गिरीष्मा नायक 625 पैकी 599 गुण मिळवून राज्यात अव्वल ठरली. विशेष म्हणजे तिने नोंदणी केली नसल्याने परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नाला ती मुकली होती. तिच्या घरी माजी शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी भेट देऊन पुरवणी परीक्षेत तिला संधी देण्याची त्यांनी ग्वाही दिली होती. ती आता 599 गुणांसह पुरवणी परीक्षेत अव्वल आहे.
कन्नड माध्यमामध्ये परीक्षेला उपस्थित झालेल्या 42671 विद्यार्थ्यांपैकी केवळ 24626 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 58 टक्के निकाल लागला. तसेच इंग्रजी माध्यमाच्या 6622 पैकी 2744 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले व निकाल 41.44 टक्के निकाल लागला. यावेळीही शहरी विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा निकाल अधिक आहे.
अल्वाच्या इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी गिरीष्मा नायक 599 गुण मिळवून राज्यात प्रथम आली.
