बेंगळुरू : दसरा संपताच राज्यातील शाळांत पहिली ते पाचवीचे प्राथमिक वर्ग भरविण्याची संपूर्ण तयारी सरकारने पूर्ण केली आहे. माध्यान्ह आहारासह सर्व आवश्यक तयारीपूर्ण केल्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.
बेंगळूर येथे सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिक्षणमंत्री नागेश म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कोविड तांत्रिक सल्ला समितीची बैठक होणार असून, तीत प्राथमिक वर्ग नेमके कधीपासून भरवायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशींनुसार हे वर्ग भरवण्यात येतील. शाळा सुरु करण्यापूर्वी शौचालय, माध्यान्ह आहार, पिण्याचे पाणी आदी सर्व सुविधांची तयारी करण्यात आली आहे. सध्या शाळांना 20 ऑक्टोबरपर्यंत सुटी असून, समितीची मंजुरी घेऊन 21 ऑक्टोबरपासून प्राथमिक वर्ग भरविण्याचा मानस आहे. सध्या भरवण्यात येत असलेल्या सहावी ते नववीच्या वर्गांतील विध्यार्थ्यांच्या हजेरीचे प्रमाण 90% असल्याचे शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले.
पाठ्यपुस्तकांतील चुकांबाबत तक्रारी आल्याने, ती सुधारण्यासाठी समिती स्थापन केली आहे. शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात कायद्यानुसार अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तसेच बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. एकंदर, दसर्यानंतर पहिली ते पाचवीचे प्राथमिक वर्ग भरविण्याची संपूर्ण तयारी सरकारने पूर्ण केली आहे. त्यामुळे बच्चे कंपनीला आता शाळेची तयारी करावी लागणार आहे.
Check Also
विधिमंडळ बैठकीत पक्षांतर्गत गटबाजी उघड; जारकीहोळी-हेब्बाळकर यांच्यात बाचाबाची
Spread the love बंगळूर : काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि सार्वजनिक बांधकाम …