दीपावलीत हरित फटाक्यानाच परवानगी, राज्योत्सवात 500 लोकांची मर्यादा
बंगळूरू : राज्य सरकारने दीपावली सण आणि राज्योत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिवाळी साध्या आणि काटकसरीने साजरी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कोविडच्या खबरदारीच्या उपायांचे पालन करून दिवाळी सण फक्त हिरव्या फटाक्यांसह साजरा करावा असे सरकारने आवाहन केले आहे.
दरम्यान, राज्योत्सव साजरा करण्यासाठी संबंधित अधिकार्यांची परवानगी आवश्यक असून 500 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.
फक्त दिवाळीत केवळ हिरव्या फटाक्यानाच परवानगी देण्यात येईल. इतर कोणतेही फटाके विकता येणार नाहीत. 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यान फटाक्यांची विक्री करण्यास अनुमती आहे. परवानाधारक व्यक्तींनीच फटाके विकावेत, अशी मार्गदर्शक तत्त्वे राज्य सरकारने दिवाळीसाठी जारी केली आहेत.
फटाके विक्रेत्यांनाही हिरव्या फटाक्यांचीच विक्री करण्याची परवानगी आहे. हिरवे फटाके सोडून इतर फटाक्यांची विक्री करण्यास मनाई आहे. तसेच, ग्रीन फटाक्यांची दुकानेही 1 ते 10 नोव्हेंबरपर्यंतच सुरू ठेवता येतील. अधिकृत परवानाधारकांसाठी फक्त ग्रीन फटाक्यांची परवानगी आहे, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील जनतेच्या भावनेतून आणि कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवाळी सण साध्या आणि काटकसरीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
दिवाळी सणाबरोबरच राज्योत्सवासाठीही राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कन्नड राज्योत्सवात केवळ 500 लोकांनाच परवानगी असेल. कोणतेही भौतिक अंतर नसलेले कार्यक्रम प्रतिबंधित असतील. राज्योत्सव साजरा करण्यासाठी संबंधित विभागांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे मार्गसूचित स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्याच्या इतर भागातही राज्योत्सव कार्यक्रमात केवळ 500 लोकांनाच भाग घेता येईल. सामाजिक अंतर नसलेल्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
मंदिरांत गोमातेची पूजा
दिवाळीतील बलिप्रतीपदेच्या दिवशी (5 नोव्हेंबर) सर्व हिंदू मंदिरात गोमातेची पूजा करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. धर्मादाय खात्याने या आधीच तसा निर्णय घेतला होता. बलिप्रतिपदे दिवशी सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत राज्यातील सर्व अधिसूचित मंदिरात गायीना आंघोळ घालावी, त्यानंतर शेंदूर, कुंकू, फूले वाहून गोमातेची भक्तीभावे पूजा करण्यात यावी, तांदूळ, गुळ, केळी व मिठाई खायला देऊन नंतर गवत खाऊ घालावे, असे आदेशात सूचित करण्यात आले आहे.
Check Also
मुनिरत्ननने दोन माजी मुख्यमंत्र्यांना अडकविले हनीट्रॅपच्या जाळ्यात
Spread the loveपीडितेकडून स्फोटक माहिती; संरक्षण दिल्यास व्हिडिओ देण्याची ग्वाही बंगळूर : माजी मंत्री आणि …