बेळगाव : यंदाची दिवाळी हलालमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले आहे.
शहरात हिंदू जनजागृती समिती आणि श्रीराम सेने यांच्या सहयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत प्रमोद मुतालिक बोलत होते. देशात अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता तपासण्यासाठी सरकारी एफएसएआय एजन्सी कार्यरत आहे. हलाल इंडिया, जमियत उमीम ए हिंद तसेच अनेक इस्लामिक संस्थांच्या वतीने शाकाहारी खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालयांना हलाल सर्टिफिकेट देण्यात आली आहेत. सरकारने सदर हलालपात्र रद्द करावीत, अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, एफएसएसआय असताना हलाल प्रमाणपत्र देण्याची गरज काय आहे? या हलाल प्रमाणपत्रासाठी सुरुवातीला 21500 आणि नूतनीकरणसाठी 15000 रुपये शुल्क आकारण्यात येते. यंदाच्या दिवाळीत मॅकडोनाल्डस आणि डॉमिनोस या संस्थेच्या आहारावर बहिष्कार घालून हि दिवाळी हलाल मुक्त साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
