
विजयपूर : कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात असून येत्या 10 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात येण्यारा अर्थसंकल्पात मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले.
विजयपूरातील कंदगल हनमंतराय रंगमंदिरात आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, ग्रामीण पत्रकारांना बस पास, पत्रकारांना देण्यात येणारा निवृत्ती वेतनात वाढ, नगराभिरुदी प्राधिकरणाच्या वतीने देण्यात येणारा निवेशन (प्लाट) राखीव ठेवणे, पत्रकारांना आरोग्य विमा सुविधा अशा विविध मागण्यांसाठी योग्य ती तरदूत करण्यात येईल असे सांगितले.
ज्ञानयोग आश्रमाचे अध्यक्ष पूज्य श्री बसवलिंग स्वामीजींचा सानिध्यात झालेल्या या संमेलनात प्रारंभी लिं. श्री सिद्धेश्वर स्वामीजी व श्री बसवेश्वर यांचा भावचित्रास पुष्प अर्पण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, स्वातंत्र्य पूर्व काळात पत्रकारांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांनी आपल्या दैनिका मधून स्वातंत्र्यासाठी जागृती निर्माण केली होती. अलिकडच्या काळात पत्रिकाद्धोम व्यवसायीक रुप घेत आहे हे योग्य नसल्याचे माझे मत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी बोलताना शहर आमदार बसवनगौडा पाटील यतनाळ म्हणाले, अलीकडे यु टुब चॅनल व बोगस पत्रकारांकडून त्रास देणे, ब्लॅकमेल करणे वाढत असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचावर कारवाई करण्यात यावी तसेच पत्रकार संघाच्या वतीनेही नियंत्रण करण्यात यावे असे सांगितले.
कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवानंद तगडूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाच्या व्यासपीठावर मंत्री सी.सी. पाटील, मंत्री मुरगेश निराणी, आमदार सोमनगौडा पाटील, रमेश भोसनूर, माजी मंत्री अप्पासाहेब पटृणशेटी, विजूगौडा पाटील जिल्हा अध्यक्ष संगमेश चुरी, मुख्य सचिव मोहन कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta