बेंगळुरू : मुख्य गृहिणीच्या खात्यात मासिक 2000 रुपये अनुदान देणाऱ्या गृहलक्ष्मी योजनेसाठी 19 जुलैपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होणार आहे.
बेंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना म्हणाल्या की, गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज सादर करणे 19 जुलैपासून सुरू होईल. कर्नाटक वन, ग्राम वन, बापूजी सेवाकेंद्र येथे अर्ज दाखल करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींमार्फत नोंदणी केल्यास मंजुरीचे पत्र घरपोच पोहोचवले जाईल. अर्जदाराने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे मंजुरीचा संदेश पाठवला जाईल. डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक लिंक केलेल्या खात्यात निधी हस्तांतरित केला जाईल. आरटीजीएसद्वारे पैसे दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले जातात. कोणतेही शुल्क नाही, अंतिम तारीख नाही, अशी माहिती त्यांनी दिली. लाभार्थीच्या नियोजित नोंदणीची तारीख, वेळ आणि ठिकाण यासाठी 1902 वर कॉल करा. किंवा माहितीसाठी 8147500500 वर कॉल किंवा मेसेज करा.
पुढे त्यांनी स्पष्ट केले की, नियोजित तारखेला नोंदणी करणे शक्य नसल्यास, तुम्ही त्याच सेवा केंद्रांना संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत कोणत्याही तारखेला भेट देऊन नोंदणी करू शकता.
Belgaum Varta Belgaum Varta