सोमवारपासून लसीकरण : ज्येष्ठ नागरिक, आघाडीच्या कर्मचार्यांना 10 पासून बूस्टर डोस
बंगळूर (वार्ता) : राज्यातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड लस मोहिम सोमवावार पासून तर, 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक डोस लस देण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत असून आरोग्य खात्याच्या कर्मचार्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. लसीकरणाची मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत.
मुख्य सचिव आणि विकास आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील चर्चा आणि निर्देशानुसार ही मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत, असे राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालिका अरुंधती यांनी सांगितले.
नवीन लाभार्थ्यांसाठी नवीन तरतुदी
* 2007 मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुले कोव्हॅक्सीन लसीसाठी पात्र आहेत. या मुलांना 28 दिवसांच्या अंतराने कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस लस देण्यात येईल.
* लसीकरणापूर्वी मुलांच्या पालकांसाठी विशेष जागरुकता बैठक आयोजित करावी आणि लसीकरणाचे महत्त्व आणि आवश्यकतेची संपूर्ण माहिती द्यावी.
* लाभार्थी आणि मुले त्यांचे स्वतःचे दूरध्वनी क्रमांक वापरू शकतात किंवा कोविनमध्ये आधीपासूनच असलेल्या पालकांच्या खात्यात नोंदणी करू शकतात. यापैकी काहीही उपलब्ध नसल्यास, शाळेचे मुख्याध्यापक फोनद्वारे नोंदणी करू शकतात.
* कोविड-19 लसीकरण प्रक्रियेसाठी शाळेचे ओळखपत्र किंवा आधार वापरून फोटो आयडी सादर करणे आवश्यक आहे.
* विकार असलेल्या मुलांना लसीकरण करण्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे. आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांनी निरीक्षण केले पाहिजे.
* शैक्षणिक संस्थांमध्ये लसीकरण न झालेल्यांना ओळखा आणि जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात लसीकरणाची व्यवस्था करा.
* खासगी शाळांना, हवे असल्यास, खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम राबविण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
* सर्व स्तरांवर कोविड-19 सावधगिरींचे पालन करून कोविड-19 लसीकरण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य आहे.
बूस्टर डोस
आरोग्य कर्मचारी आणि आघाडीचे कर्मचारी तसेच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक त्यांच्या विद्यमान कोविन खात्याद्वारे लस मिळवू शकतात.
Check Also
विधिमंडळ बैठकीत पक्षांतर्गत गटबाजी उघड; जारकीहोळी-हेब्बाळकर यांच्यात बाचाबाची
Spread the love बंगळूर : काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि सार्वजनिक बांधकाम …