Friday , February 23 2024
Breaking News

पहिल्या दिवशी ६.३८ लाख मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

Spread the love

उद्यापासून लसीकरण, ४,१६० लसीकरण शिबीरे

बंगळूर : राज्यातील १५ ते १८ वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण अभियानाची आरोग्य खात्याने तयारी पूर्ण केली आहे. लसीकरण मोहिम उद्या (ता. ३) पासून राज्यभरात सुरू होणार असून यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ४,१६० लसीकरण शिबिरे सज्ज करण्यात आली आहेत. पहिल्या दिवशी ६.३८ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
लसीकरण कार्यक्रम १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना उपलब्ध होईल. आधीच शनिवारी सकाळी, कोविन पोर्टलवर मुलांची नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे, भरपूर मुलांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. राज्यात ३१.७ लाख बालके लसीकरणासाठी पात्र आहेत.  त्यांना लसीकरण करण्याची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्‍हा पातळीवर व आमदार विधानसभा मतदारसंघातील  शाळा/महाविद्यालयातील लसीकरण कार्यक्रमाला चालना देतील.
शाळा आणि महाविद्यालयातील बालकांना लसीकरण करण्याच्या उद्देशाने, आरोग्य विभागाचे अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र शाळा निश्चित करून तिथे लसीकरण शिबिरे आयोजित केली जात आहेत. पहिल्या दिवशी राज्यातील ३१ जिल्ह्यांतील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ४,१६० लसीकरण शिबिरांत ६.३८ बालकांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. थेट नोंदीची व्यवस्था
लसीचा डोस घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी कोविन पोर्टलवर नोंदणी करणे सक्तीचे नाही. आधार कार्ड किंवा शाळेचे ओळखपत्र घेऊन थेट शाळेत जाऊन, पालक किंवा स्वत:चा मोबाईल क्रमांक देऊन ते नोंदणी करू शकतात. शाळेच्या शिबिरात स्थानिक आरोग्य सहाय्यक यासाठी मदत करतील.
खाजगी लसीकरण
बंगळुरसह प्रमुख शहरांमधील निवडक खासगी रुग्णालयांमध्ये बालकांना लसीकरण करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी प्रति डोस १,४१० रुपये दर निश्चित केला आहे. काही रुग्णालयांमध्ये लहान मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी पॅकेजेस आहेत.
खबरदारीच्या दृष्टीने राज्यातील शाळा/महाविद्यालयांमध्ये बालकांच्या लसीकरणास प्राधान्य दिले जात आहे. मुलांना कोव्हॅक्सीनचा डोस देण्यात येणार आहे.  लसीचे २० डोस असलेल्या कुपीमधील कोव्हॅक्सीन लस मुलांना दिली जाणार आहे. एकदा कुपी उघडल्यानंतर, २० मुलांना प्रदान करणे आवश्यक आहे. २० बालके आरोग्य केंद्रात न आल्यास लस वाया जाते. त्यामुळे शाळा/कॉलेजमध्येच लसीकरणास प्राधान्य दिले पाहिजे. आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की एकदा सर्व २० मुलांची ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर सर्व प्राथमिक, सामुदायिक, तालुका आणि जिल्हा आरोग्य केंद्रांमध्ये सर्व बालकांचे लसीकरण केले जाईल.
२० लाख डोस उपलब्ध
राज्याच्या आरोग्य विभागाकडे सध्या २० लाख कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध आहेत. केंद्र सरकारकडून ही लस टप्प्याटप्प्याने येणार आहे. रविवारीही लसीचे तीन लाख डोस उपलब्ध होतील. सध्या राज्यातील सर्व  जिल्हा संकलन केंद्रात लसीचे डोस पाठविण्यात आले आहेत. आरोग्य केंद्रांना प्राधान्य क्रमाणे लसचा पुरवठा करण्यात येणार आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना ९९ टक्के कोव्हीशिल्डचा डोस देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या लसीकरण विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले की, पहिल्या आठवड्यात लशीच्या डोसचा तुटवडा भासणार नाही. त्यानंतर केंद्राकडून लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धरामय्या यांच्यावरील खटल्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Spread the love  बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्यातील 2022 च्या निषेध मोर्चाच्या संदर्भात मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *