बेळगाव : स्पर्धेमुळे स्वतःतील कलागुणांना सादर करण्याची संधी मिळते. या संधीमुळे आपल्यातील आत्मविश्वास वाढतो. म्हणून महिलांनी विविध स्पर्धेत भाग घ्यावा असे युनिटी क्वीन ऑफ इंडिया स्पर्धेच्या उपविजेत्या व तारांगण सेल्फी स्पर्धेच्या प्रायोजिका गीता डोईजोडे यांनी सांगितले. सेल्फी विथ गुढी या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या.
आपणही सामान्य गृहिणीच होतो. हलगेकर फौंडेशनच्या टेराकोटा ज्वेलरी स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून प्रथमच सहभागी झालो होतो. विविध उपक्रमात भाग घेत पुढं सौदर्य स्पर्धेची विजेती कशी झाले हे त्यांनी सांगितले. आपल्यासारखे इतरही महिलांनी पुढे यावे असे त्या म्हणाल्या.
यावेळी तारांगणच्या सेल्फी विथ गुढी स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण केले.
स्वागत व प्रास्ताविक केंद्र संचालिका नेत्रा मेणसे यांनी केले. आभार केंद्र संचालिका स्मिता मेंडके यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे-
प्रथम क्रमांक – सविता चिल्लाळ,
द्वितीय क्रमांक – प्रतिमा पवार
तृतीय क्रमांक – माधवी हिंडलगेकर
उत्तेजनार्थ – रूपा हदगल, जुही खेडकर, रुक्मिणी पाटील, दीपा भागाजे.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शारदा भेकने, अर्चना पाटील, सविता वेसने, विजया मोहिते, सुधा माणगावकर, स्मिता चिंचणीकर, सारिका बोभाटी, सीमा मुरकुटे उपस्थित होत्या.