Friday , February 23 2024
Breaking News

गणेबैल येथे दोन मुलांचा पाण्यात पडून मृत्यू, गावात हळहळ

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : गणेबैल (ता. खानापूर) येथील दोन शाळकरी मुलांचा पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दि. २१ रोजी गणबैल गावापासुन जवळच घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गणेबैल गावातील विठ्ठल परशराम निलजकर (वय १२) इयता ६ वीचा विद्यार्थी व भुतनाथ दिपक निलजकर (वय ८) हे दोघेही आजी म्हैस घेऊन गेली म्हणून तिला बघायला गेले होते. आजी घरी परतली. हे दोघेही रविवारी ज्या खड्ड्यात म्हैस पडली होती. तो खड्डा पहाण्यासाठी पुढे गेले नेमके त्याच एकट्याच पाय घसरला व तो खड्ड्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसराही बुडाला. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना घडताच गणेबैल गावावर शोककळा पसरली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
दोघेही त्याच्या कुटुंबाला एकटेच मुलगे होते.

About Belgaum Varta

Check Also

खेलो इंडियात दोन सुवर्णपदकाची मानकरी ठरली अनुमती चौगुले

Spread the love  बेळगाव- बेळगावची होतकरू जलतरणपटू अनुमती अनिल चौगुले हिने गुवाहाटी येथे झालेल्या खेलो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *