मंत्री शशिकला जोल्ले : दहावी परीक्षेच्या अधिकारी, कर्मचार्यांना लसीकरण
निपाणी : कोरोना रोखण्यासाठी आरोग्य खाते पोलीस प्रशासन अंगणवाडी व अशा कार्यकर्त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्यामुळेच निपाणी तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यामध्ये लहान मुलांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून दहावीच्या विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले.
दहावीच्या परीक्षेसाठी कार्यरत असणार्या अधिकारी व कर्मचार्यांना लसीकरणाचा प्रारंभ येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.5) झाला. त्यावेळी मंत्री जोल्ले बोलत होत्या.
मंत्री जोल्ले म्हणाल्या, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकार्यांनी संयुक्तरीत्या काम केल्याने या भागातील कोरोना संसर्ग कमी झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात शासनातर्फे सर्वसामान्य कुटुंबांना मोफत रेशन पुरवठा करून त्यांना आधार देण्यात आला आहे. दैनंदिन लसी बरोबरच आता निपाणी तालुक्यासाठी 10 हजार लसीकरणाची लेखी मागणी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. लवकरच यश आल्यानंतर सर्वांनाच लसीकरण होणार आहे तोपर्यंत नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.
गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांनी, तालुक्यातील शिक्षकांनी कोगनोळी नाक्यावर सेवा बजावण्यास सह कोरोना मुक्तीसाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. मंत्रीमहोदयांच्या मार्गदर्शनामुळे व वैद्यकीय खात्याच्या सहकार्यामुळे या भागातील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी, सध्या निपाणी तालुका अनलॉक झाला असला तरी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. मंत्री जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले त्यांनी सुरू केलेल्या येथील सेंटरमुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा मिळण्यासह या भागातील कोरोना आटोक्यात आल्याचे सांगितले. अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी गडाद, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी पहिल्या टप्प्यात शिक्षकासाठी आलेल्या 150 जणांना लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमास उपनगराध्यक्षा नीता बागडे, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, नगरसेवक राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, दत्तात्रय जोत्रे, विनायक वडे, श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, नगरसेविका उपासना गारवे, आशा टवळे, डॉ. सीमा गुंजाळ, डॉ. गणेश चौगुले, गोपाळ नाईक, डॉ. संतोष गाणीगेर, गणू गोसावी, विश्वनाथ जाधव, प्रशांत रामनकट्टी, बाहुबली लखनन्नावर, सुनील शेवाळे, महेश खोत, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, एस. व्ही. तराळ, पिंटू बागडे, विजय टवळे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
