कुद्रेमानी : कुद्रेमानी येथील ग्रामपंचायत कुद्रेमानी व प्राथमिक आरोग्य केंद्र उचगांव यांच्यावतीने कोविड19 रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
या लसीकरणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. आज 180 जणांना लस देण्यात आली.
आतापर्यंत तीन टप्प्यात 480 नागरिकांना कोवीशिल्ड लस देण्यात आली.
यावेळी कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस युवा कमिटीचे अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांनी गावातील सर्व नागरिकांनी कोविड19 हा विषाणूजन्य रोग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी लसीकरण करून घेवुन या रोगाला पळवून लावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी मृणाल हेब्बाळकर, ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनायक पाटील, सदस्य अरुण देवण, शिवाजी मुरकुटे, आरती लोहार, पीडीओ प्रकाश कुडची, सचिव हणमंत किल्लेकर, दिपक पाटील, वैजू राजगोळकर, गोपाळ चौगुले, रवींद्र पाटील, शंकर पाटील, रुक्माणा कागणकर, शाहू पाटील, परिचारिका विजयालक्ष्मी, उल्का जाधव-पाटील, आशा कार्यकर्त्या नंदा पाऊसकर, सुनिता बिजगर्णीकर, नंदा शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी सहकार्य केले.