/प्रतिनिधी
बेंगळूर : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना एसएसएलसी परीक्षेस सामोरे जाण्यापूर्वी लस देण्याचे ठरविले आहे, परंतु अनेक माध्यमिक शिक्षकांना वेळेत दोन्ही डोस न मिळाण्याची भीती आहे. त्यामुळे परीक्षेच्या आधी सर्व शिक्षकांचे वेळेवर लसीकरण होणे गरजेचे आहे.
कोरोनाचा धोका ओळखून राज्य सरकारने १२ वी ची परीक्षा रद्द केली असून १० वीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात एसएसएलसी, पीयूसी बोर्ड परीक्षा २०२१ आयोजित करण्याचा अंतिम निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बारावीची परीक्षा रद्द, तर दहावीची परीक्षा होणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी १० वाजता मंत्री शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बैठक घेऊन एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षेविषयी अंतिम निर्णय जाहीर केला.
तसेच शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी जाहीर केले की जुलैच्या तिसर्या आठवड्यात राज्यात एसएसएलसी परीक्षा घेण्यात येणार. दहावीची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारावर होणार आहे. एसएसएलसी परीक्षेची तारीख ही परीक्षेपूर्वी २० दिवस आधी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांना आतापासूनच लसीकरण करण्यास सुरुवात केली तरी सुद्धा दुसरा डोस न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांना लसीकरण पूर्ण होईल की नाही याची चिंता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta