खानापूर (प्रतिनिधी) : सात जन्मी हाच पती मिळू दे. असे म्हणत वडाच्या झाडाची पुजा करत खानापूरात वटपौर्णिमा साजरी झाली.
यावेळी सुवासिनीनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्माच्या प्राप्तीसाठी हिंदू धर्मातील स्त्रिया वटपौर्णिमे दिवशी वडाची मनोभावे पुजा करतात.
आज गुरुवारी दि. २४ रोजी खानापूरातील विद्यानगरात वटपौर्णिमेदिवशी वडाची पुजा करण्यासाठी सुवासिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सुहासिनी मला व माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे म्हणून वडाला सुती धागा धरून तीन फेऱ्या मारून मनोभावे पूजा करून अखंड आयुष्य लाभू दे असा आशिर्वाद घेतला. वान म्हणून पाच प्रकारच्या फळाची भेट देऊन एकमेकीला दिली.
यावेळी नववधू, सुवासिनि मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta