Monday , December 8 2025
Breaking News

पालकमंत्री सतेज पाटील शिवसेना संपवतील – चंद्रकांत पाटील

Spread the love

पालकमंत्री सतेज पाटील शिवसेना संपवतील – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – पालकमंत्री सतेज पाटील शिवसेना संपवतील. त्यांच्यापासून शिवसेनेने सावध राहावे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज येथे लगावला.

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना ते बोलत होते. या मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर थेट टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शिवसेनेचा कार्यकर्ता हतबल आहे, नाराज आहे, अस्वस्थ आहे.

रोज उठून मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मोर्चे काढले जातात. त्यामुळे अस्वस्थ आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसैनिकांना आपल्याला वाटेल ते करण्याची संधी आहे. ही संधी गेली तर काँग्रेस तुमच्या बोकांडीवर कायमची बसेल. यावर उद्या खासदार संजय राऊत म्हणणार आहेत, आमच्या घरचं आम्ही पाहतो. काय पाहता? ते रोज सकाळ-सायंकाळी दिसते आहे. टीव्ही ऑन करा म्हणजे कळेल.

 

Koo App

चालू अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याच मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. राज्याच्या इतरही भागात असे प्रकार घडले असतील, सरकारचा आदिवासींच्या जमिनीवर डोळा आहे, हे सरळ सरळ दिसून येतंय.

Chandrakant Patil (@ChDadaPatil) 24 Mar 2022

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *