Wednesday , December 4 2024
Breaking News

एमएस धोनीने CSK चे सोडले कर्णधार पद

Spread the love

एमएस धोनीने CSK चे सोडले कर्णधार पद

 

आयपीएल 2022 च्या हंगामापूर्वी, CSK ने त्यांच्या नेतृत्वात मोठा बदल केला आहे. “एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार पद सोडले आहे.

एमएस धोनीने CSK चे सोडले कर्णधार पद

आयपीएल 2022 चा हंगाम सुरु होण्याच्या दोनच दिवस आधीच महेंद्रसिंग धोनीने सर्वांना चकित केले असून CSK चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंग धोनीने आगामी इंडियन प्रीमियर लीग मध्ये एक किंवा दोन सामने न खेळण्याचा निर्णय घेतल्यास रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सांभाळू शकेल, असे याआधी माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले होते. 2008 मध्ये लीग सुरु झाल्यापासून धोनी सीएसकेचा कर्णधार आहे. आणि विशेष म्हणजे हा हंगाम धोनीचा शेवटचा असू शकतो. त्याने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

 

दरम्यान, महेंद्र सिंगने 12 व्या हंगामात चेन्नईचे नेतृत्व केले आहे. 2008 मध्ये जेव्हा लीग सुरु झाली तेव्हापासून धोनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. मात्र 2016 आणि 2017 मध्ये संघाने लीगमध्ये भाग घेतला नव्हता. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चार वेळा संघाला चॅम्पियन बनवले आहे. चेन्नई हा या लीगमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो.

CSK ने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले

संघाने आपल्या अधिकृत निवेदनात लिहिले की, ‘महेंद्रसिंग धोनीने निर्णय घेतला आहे की त्याला चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडायचे आहे. त्याने संघाचा नवा कर्णधार म्हणून रवींद्र जडेजाची निवड केली आहे. जडेजा 2012 पासून संघाचा भाग आहे. तो आमच्या संघाचा तिसरा कर्णधार असेल. महेंद्रसिंग धोनी या सीझनसाठी आणि त्यानंतरही संघाशी जोडला जाईल. IPL 2022 च्या मेगा लिलावात रवींद्र जडेजाला चेन्नईने कायम ठेवले होते. चेन्नईने कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये सर्वात महागडा जडेजा खेळाडू आहे. त्याला चेन्नईने 16 कोटी दिले होते. तर एमएस धोनीला संघाने 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

आर. अश्विन आणि जडेजाने लाज राखली, पहिल्या दिवशी भारताच्या 6 बाद 339 धावा

Spread the love  चेन्नई : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *