निपाणी पोलिसांनी केली कोरोनाच्या दुसर्या लाटेवर मात : व्यायामावर केले लक्ष केंद्रित
निपाणी : योग्य नियोजनामुळे निपाणी पोलीस कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. परिणामी, कोरोनाच्या दुसर्या लाटेत एकाही पोलिसाला प्राण गमवावे लागले नाहीत. यावरून पहिल्या लाटेनंतर आलेल्या अनुभवातून घेतलेल्या खबरदारीमुळे पोलिसांची रोगप्रतिकारशक्ती बर्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
निपाणी मंडल पोलीस निरीक्षक कार्यक्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णसंख्या ही 800च्या हजारच्या घरात पोचला आहे. तर मृतांचा आकडा 75 पर्यंत पोहोचला आहे. त्यात नगरपालिका, शहर, उपनगरे आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. सेवाभावी संस्थांच्या सर्वेक्षणानुसार या क्षेत्रात एकूण 76 जणांचा अद्यापपर्यंत कोरोनाने बळी गेला आहे. मात्र वेळीच केलेल्या योग्य नियोजनामुळे पोलिसांवरील संकट मर्यादितच राहिले आहे. तर सद्यस्थितीला केवळ एकही पोलीस कोरोना बाधित नसून सर्वांची प्रकृती चांगली आहे. वर्षांपासून सतत शहर ग्रामीण भाग आणि राष्ट्रीय महामार्गावर बंदोबस्तावर असतानाही पोलिसांनी कोरोनावर मात करून दाखवली आहे.
—–
प्रकृतीकडे दिले विशेष लक्ष पहिल्या लाटेत बंदोबस्त दरम्यान शहर आणि राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. पण वेळीच उपचार झाल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे दुसर्या लाटेत पोलिसांच्या प्रकृतीवर विशेष लक्ष देण्यात आले. यामुळे दुसर्या लाटेत पोलीस बंदोबस्तावर असूनही संसर्ग होऊ शकला नाही. शिवाय यावर्षी एकाही पोलिसाचा बळी गेलेला नाही. यासाठी पोलिसांमधील रोगप्रतिकारकशक्ती व खबरदारी प्रभावी ठरल्याचे दिसून येत आहे.
—-
’कोरोनाच्या दुसर्या लाटेचा पोलिसांवर फारसा परिणाम झाला नाही. दुसया लाटेत पोलिसांचे मृत्यू रोखण्याच्या उद्देशाने खबरदारी घेतली. त्यानुसार पोलिसांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्यावर भर दिला. शिवाय पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करून मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
– आय. एस. गुरुनाथ, प्रभारी मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी.
Check Also
बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
Spread the love उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …