Friday , October 18 2024
Breaking News

ड्रेनेजची पाईप फुटून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर

Spread the love

बेळगाव : अनगोळ वड्डर गल्लीत ड्रेनेजची पाईप फुटून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी पसरले आहे.
दुर्गंधीयुक्त पाणी साचल्यामुळे तेथील  नागरिकांची खूप गैरसोय होत आहे आणि दुर्गंधी व वास खूपच धोकादायक आहे व यामुळे वड्डर गल्ली अनगोळ येथील परिसरातील नागरिकांना साथीचे असलेले आजार होऊ शकतात. ही ड्रेनेज पाईप गल्लीत असल्यामुळे सांडपाणी वाहून तळे साचले आहे. वाहतुकीस अडथळा व आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाईपची दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक अवर्सेकर यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

उद्योजक संतोष पद्मन्नावर खून प्रकरणी पत्नीला अटक; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

Spread the love  बेळगाव : उद्योजक संतोष पद्मन्नावर यांच्या हत्येप्रकरणी संतोषची पत्नी उमा हिला अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *