Friday , December 27 2024
Breaking News

नागरदळे येथील एअर फोर्सचा जवान कडेलगेच्या ओढ्यातून वाहून गेला

Spread the love

चंदगड तालूक्यात हळहळ

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कडलगे -ढोलगरवाडी (ता. चंदगड) या दोन्ही गावालगत असणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुरातून नागरळे येथील अभिषेक संभाजी पाटील (वय 26) हा युवक दुचाकीसह वाहून गेला. तर याच दुचाकीवरून प्रवास करणारा शशिकांत संभाजी पाटील हा युवक सुदैवाने बचावला.
अभिषेक हा आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्य
ढोलगरवाडीला गेला होता. तेथून आपल्या नागरदळे गावी परतत असताना कडलगेच्या ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही. स्पेंडर गाडी पाण्यात जाताच पाण्याच्या प्रचंड वेगाने ती कलंडली. यामध्ये अभिषेक पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला तर अभिषेकला पकडून ठेवण्याचा प्रयत्न शशिकांतने केला. पण पाण्याच्या प्रचंड वेगाने ते शक्य झाले नाही. पाण्याबाहेर असणाऱ्या काही युवकांनी शशिकांत व गाडीला पाण्याबाहेर सुरक्षित काढले. युवक वाहून गेल्याची बातमी परिसरात कळताच ओढा परिसरात शोध मोहिम राबविण्यात आली. पण अद्याप शोध लागला नव्हता. या घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाटील यांनी यासंदर्भात प्रशासनास सुचना केल्या आहेत. तर कोवाड पोलिस औट पोष्टचे पो.कों. कुशाल शिंदे, अमर सायेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम राबवली. सर्वत्र पाणी आल्याने रेस्कू टिम घटनास्थळी पोहचण्यामध्ये मोठी अडचण मिर्माण झाली आहेत. तर अंधार पडल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली असून उद्या पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.

दुर्दैवी अभिषेक –

सैन्यदलात दाखल होऊन भारतमातेची सेवा करण्याचे तीव्र स्वप्न अभिषेकने उराशी बाळगले होते. त्यानुसार भारतीय एअर फोर्समध्ये आभिषेक जॉईन होऊन गेल्या दोन वर्षापासून सेवा बजावत आहे. तो सुट्टीवर गावी आला होता. पण ड्यूटी जॉईन करण्यापूर्वीच तो पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने तो सुरक्षित रहावा अशीच सर्वजन प्रार्थना करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी- दोडामार्ग घाटात गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडला, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love  चंदगड : तिलारी- दोडामार्ग घाटात कोदाळी गावच्या हद्दीत तब्बल १५ लाख रुपये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *