कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हदनाळ, आप्पाचीवाडी भागात ऊसाला तुरे फुटल्याने ऊस वजनात घट झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर बनला आहे. ऊसाला तुरे फुटून ऊस पोकळ होऊन 20 ते 25 टक्के वजनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागाला बारमाही वाहणारी दूधगंगा नदी वरदान ठरली आहे. या परिसरामध्ये तंबाखू, ऊस पिके शेतकरी घेत असतात. चालू गळीत हंगामात ही ऊसाची तोडणी मोठ्या प्रमाणात सुरु असून शेतकरी आपला ऊस लवकर कसा जाईल याकडे लक्ष दिले आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी ऊस पडला आहे. अशातच ऊसाला तुरे फुटल्याने उसाची वाढ खुंटली आहे. यामुळे ऊसाचे वजन कमी होऊ लागले आहे. या भागातील सरसकट ऊसाला तुरे फुटू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. ऊस तोडणी सुरू झाल्याने जनावरांच्या चार्याचा प्रश्न मिटला होता. पण ऊसाला तुरे फुटल्याने ऊसाचे वाडे जनावरांना घालण्याचे देखील मुश्कील बनले आहे. बदलणारे वातावरण अतिवृष्टी यासह विविध कारणांनी शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. शेतकरी आपल्या शेतातील ऊस लवकरात लवकर कारखान्याला पाठवून देण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसून येत आहे.
Check Also
बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
Spread the love उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …