Sunday , December 22 2024
Breaking News

सौंदलगाजवळ अपघातात दोन ठार

Spread the love

कोगनोळी (वार्ता) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्‍या सौंदलगा जवळच मोटर सायकल व कार अपघात होऊन दोन ठार झाल्याची घटना शुक्रवार तारीख 17 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
या अपघातात ठार झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कार क्रमांक एमएच 03 सीबी 4915 ही कोल्हापूरकडून निपाणीकडे जात होती. सौंदलगाजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून याच रस्त्यावरून निपाणीकडे जात असलेल्या मोटरसायकल क्रमांक एमएच 09 एफयू 4802 गाडीला जोराची धडक बसली. या धडकेमध्ये मोटरसायकलस्वार ठार झाला. तर कार रस्त्याच्या बाजूला असणार्‍या झाडाला धडकून पुढे सेवा रस्त्याच्या बाजूला असणार्‍या कांद्याच्या शेतात पडली. या कारमधील महिला ठार झाली.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, एएसआय विजय पाटील, पोलीस अमर चंदनशिव, एम. एफ. नदाफ, एन. एस. सगरेकर यांनी भेट देऊन अपघातग्रस्त वाहनातील जखमींना निपाणी येथील महात्मा रुग्णालयात दाखल केले. जयहिंद रोड डेव्हलपर्सच्या कर्मचार्‍यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द

Spread the love  उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *