प्रांताधिकारी संतोष कामगौडा : रयत संघटनेने घेतली भेट
निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी परिसरात सहा पदरी रस्त्याचे काम व काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीसाठी जागा दिली जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे ही बाब लक्षात घेऊन तळ्यात संघटनेतर्फे वर्षभरापासून आंदोलन मोर्चे काढून निवेदन दिले जात आहे. शेतकर्यांच्या समस्या लक्षात घेऊन आपण लवकरच कोगनोळी परिसरातील जमीन संपादन आणि शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही चिकोडीचे नूतन प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांनी दिली. रयत संघटनेतर्फे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांत अधिकार्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यासह त्यांना निवेदन सादर केले. त्यावेळी कामगौडा बोलत होते.
चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी, गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी व महापुरामुळे नदीकाठच्या गावातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत मात्र आजतागायत त्यांना भरपाई मिळालेली नाही. परिणामी अनेक जण कठीण प्रसंगाचा सामना करीत आहेत. याशिवाय लॉकडाऊनमध्ये अनेक भाजीपाला शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई न देता त्यांच्याकडूनच घरपट्टी, पाणीपट्टी, विज बिल वसूल करून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे अनेक गावात वीज बिल न भरल्याने वीज जोडणी तोडली जात आहे. त्याचा विचार करून प्रांताधिकार्यांनी योग्य न्याय देण्याचे आवाहन केले.
प्रांताधिकारी कामगौडा यांनी संघटनेने मांडलेल्या समस्या लक्षात घेऊन लवकरच तालुका पातळीवरील अधिकार्यांच्या बैठका घेऊन गाव पातळीवरील तलाठी, सेक्रेटरीच्या बैठका घेऊन त्यांना योग्य ते निर्देश दिले जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी संघटनेचे निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब हादीकर, सेक्रेटरी कलगोंडा कोटगे, भगवंत गायकवाड, नारायण पाटील, अनंत पाटील, विजय सावजी, राजू चौगुले, पुंडलिक माळी, मधुकर इंगवले, प्रकाश परीट, युवराज माने, राजू पाटील, नामदेव साळुंखे, कुमार पाटील, तानाजी पाटील, नारायण पाटील, शरद भोसले, चीनु कुळवमोडे, सर्जेराव हेगडे यांच्यासह संघटनेचे गाव पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
Spread the love उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …