Friday , October 18 2024
Breaking News

मनःशांतीसाठी सत्संग सोहळ्यांची गरज

Spread the love

सचिनदादा पवार : निपाणीत एक दिवशीय कीर्तन सोहळा
निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात मनुष्य क्षणिक सुखाच्या मागे धावत सुटला आहे. सत्ता संपत्ती गोळा केल्याशिवाय चैन पडेनासे झाले आहे. मात्र आपला देह शाश्वत नसून तो अल्पावधीतच आहे. त्यामुळे गोळा केलेले धन हे कुबेराची आहे. मनशांतीसाठी सत्संग सोहळ्याची गरज असून त्यामध्ये प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे असे मत पुणे येथील कीर्तनकार सचिनदादा पवार यांनी व्यक्त केले.

येथील दौलत नगरमधील दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन व हेल्थ क्लब, निपाणी जायंटस क्लबतर्फे इंदुमती दौलतराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवारी (ता.६) दौलतनगर येथे आयोजित एक दिवशीय कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.
सचिनदादा पवार म्हणाले, दांभिकपणा अहंकारामुळे दुःख वाट्याला येत असते. त्यापासून दूर होण्यासाठी परमार्थात कार्यरत राहणे आवश्यक आहे. परमार्था मुळे जीवनाचा उद्धार होत असतो पैशाने प्रतिष्ठा आणि माणसे विकत घेता येत नाहीत, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. पैसा, प्रतिष्ठा आणि तारुण्यामुळे जीवनात अनेकदा अपयश येत असते. त्यासाठी कर्म महत्त्वाचे आहे. जीवनात नेहमी महापुरुषांच्या विचारांचा आदर्श जोपासला पाहिजे. माणसांचा जन्म हा वासनेतून होत असून साधुसंतांचा जन्म हा जगाच्या उद्धारासाठी होत असतो. संतांच्या हातूनच समाजातील दुस्कृत्यांचे नाश केले जाते. त्यासाठी पांडुरंगाला शरण जीवनाचे कल्याण करून घ्यावे.
प्रारंभी फाऊंडेशनचे संस्थापक निकु पाटील यांनी स्वागत केले महादेव बन्ने यांनी, प्रास्ताविकात फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. सचिनदादा पवार यांचा लक्ष्मण चिंगळे, राजेश कदम यांच्या हस्ते सत्कार झाला.
सकाळी ९ वाजता प्रतिमा व विणा पूजन, सकाळी १० वाजता ज्ञानेश्वरी ९ व १२ व्या अध्यायाचे पारायण झाले, व्यासपिठ चालक म्हणून कुर्ली येथील प्रभाकर आनंदराव प्रताप यांनी काम पाहिले. सायंकाळी ४ते ९ हरिपाठ असून यमगर्णी, सौंदलगा, भिवशी, नांगनूर, कुरली भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी ६ वाजता प्रवचनकार भागवत तुकाराम संत महाराज यांचे प्रवचन झाले. त्यानंतर महाप्रसाद वाटप, हुडको कॉलनी येथील विरभद्रेश्वर महिला भजनी मंडळ, राजू माने -यमगर्णी, सत्यजीत निकाडे -कुर्ली, बाळासाहेब तिबिले -मत्तिवडे, आण्णासाहेब पाटील- भैरापूर, श्रीमंत ( पिंटू ) पाटील -बुदलमुख, नवनाथ घाटगे-यरनाळ, श्रीधर पाटील- शेंडूर, आबाजी मोरे, संदिप मोरे- यमगरणी, शिवाजी पाटील लिंगनूर (कापशी) यांच्यासह निपाणी, बुदलमुख, यमगर्णी, बुदिहाळ, यरनाळ, वाळकी, शिरगुप्पी, शेंडूर, गोंदुकप्पी व परिसरातील वारकरी मंडळांचा हरीजागराचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास माजी नगरसेवक दिलीप पठाडे, नगरसेविका अनिता पठाडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष वसंत धारव, अशोक पाटील, सुरेश घाडगे, स्वप्नील पावले, रमेश भोईटे, बबन निर्मले, मनोहर कापसे, नारायण यादव, आकाश मल्लाडे, रणजीत मगदूम, हिमांशू पाटील, विक्रांत पावले, विक्रांत पोवार, सागर पाटील, पंकज पाटील, पुंडलीक कुंभार,महादेव मल्लाडे, नितीन उपाळे, राजू पाटील, चंद्रकांत पावले, सोमनाथ शिंपुकडे, गजानन शिंदे, आर. के. धनगर, श्रीकांत तावदारे, संजय सूर्यवंशी, सुनील लाटकर यांच्यासह निपाणी आणि परिसरातील वारकरी व भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *