Sunday , September 8 2024
Breaking News

खानापूरातील एस टी समाजासाठी स्मशानभूमीत शेडची उभारणी

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नाईक गल्लीतील एस टी समाजासाठी खानापूर नगरपंचायतीच्या वतीने स्मशानभूमीत शेड उभारणीचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी, माजी स्थायी कमिटीचे चेअरमन लक्ष्मण मादार, नगरसेविका मेघा कुंदरगी, नगरसेवक हणमंत पुजारी, नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब माने, सुप्रिडेंट प्रेमानंद नाईक, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रेमानंद नाईक यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
तर नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या हस्ते शेड उभारणीच्या जागेचे पुजन करण्यात आले. यावेळी स्थायी कमिटीचे चेअरमन लक्ष्मण मादार यांच्याहस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ केला.
यावेळी बोलताना स्थायी कमिटीचे चेअरमन लक्ष्मण मादार म्हणाले की, खानापूरच्या नाईक गल्लीतील एस टी समाजासाठी स्मशानभूमित शेड उभारणे अत्यंत गरजेचे होते. यासाठी खानापूर नगरपंचायतीच्यावतीने वतीने निधी मंजूर करून शेड उभारण्यात येणार आहे. त्यामुळे स्मशान भूमीतील समस्या दुर होणार आहे, असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला खानापूर नाईक गल्लीतील एस टी समाजाचे जेष्ठ नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

Spread the love    खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *