Sunday , July 26 2026
Breaking News

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love

 

बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय बेळगावच्या मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. हा सण २२ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
शुक्रवारी येथील मुस्लिम धर्मगुरू व विविध मुस्लिम संघटनांच्या प्रमुखांची बैठक अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी यासाठी पुढाकार घेतला. आमदार सेठ यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या निर्णयाच्या माध्यमातून बेळगावच्या मुस्लिम बांधवांनी धार्मिक सलोख्याचे एक नवे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. गणेशोत्सव काळातच ईद-ए-मिलाद हा सण आल्यामुळे जिल्हा व पोलिस प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण झाले होते. त्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांमध्ये शांतता समितीची बैठक घेतली जात होती. त्यावेळी दोन्ही सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलिसांकडून केले जात होते. या बैठकांना दोन्ही समाजाच्या प्रमुखांना बोलावले जात होते, पण सण पुढे ढकलण्याबाबतचा निर्णय झाला नव्हता. राजू सेठ या संदर्भात मुस्लिम धर्मगुरू व मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. त्यांच्यासोबत सातत्याने चर्चा करीत होते. सेठ यांनी याबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांच्यासोबत प्राथमिक चर्चा केली होती. पण ईद-ए- मिलाद सण पुढे ढकलण्याबाबत अंतिम निर्णय झाला नव्हता. गणेशोत्सवाच्या आधीच याबाबतचा निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी सायंकाळी अंजुमन-ए- इस्लाम या संस्थेच्या सभागृहात बैठक झाली.
बैठकीत सण पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. शिवाय हा सण २२ रोजी साजरा करण्याचा निर्णयही झाला. सेठ यांच्यासह उपस्थित धर्मगुरू व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त केले. या निर्णयाची माहिती रात्री प्रशासनाला व माध्यमांना देण्यात आली. याआधीही एकदा सण पुढे ढकलण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला होता.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *